Thalapathy Vijay Divorce News : लग्नाच्या 22 वर्षानंतर पत्नीला घटस्फोट देतोय विजय थलपती?
Thalapathy Vijay Divorce लग्नाच्या 22 वर्षांनंतर अभिनेता घेतोय घटस्फोट? काय आहे कारण... चला जाणून घेऊया...
Vijay Thalapathy and Wife Sangeetha Getting Divorce : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय थलपथीचे (Vijay Thalapathy) लाखो चाहते आहेत. विजय हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. विजय आणि त्याची पत्नी संगीता (Sangeetha) यांची जोडी ही चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. त्यांची लव्ह स्टोरी ही कोणत्याही चित्रपटाच्या कहानीपेक्षा कमी नाही. त्या दोघांच्या लग्नाला 22 वर्षे झाले आहेत. विजयला त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं आवडत नाही. दरम्यान, आता ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
पिंकव्हिलानं दिलेल्या एका वृत्तानुसार, विजयच्या विकिपीडिया पेजवर ते दोघं घटस्फोट घेणार असल्याची पोस्ट केली होती. हे दोघं परस्पर सामंजस्यानं घटस्फोट घेणार असल्याचे त्या पेजवर म्हटले आहे. मात्र, या सगळ्या अफवा आहेत. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार, या बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही. (Vijay Thalapathy and Wife Sangeetha Divorce Rumours)
त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होण्याचे कारण हे संगीता वरिसूच्या (Varishu) ऑडिओ लॉन्चला उपस्थित नव्हती." दरम्यान, विजयची पत्नी संगीता ही सध्या तिच्या मुलांसोबत यूएसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. याच कारणामुळे संगीता कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहू शकली नाही. तर लवकरच विजय त्याच्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करण्यासाठी युएसला जाणार आहे. मात्र, अधिककृत रित्या या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही.
हेही वाचा : Deepika Ranveer Divorce: फक्त चाहत्यांना दाखवण्यासाठी एकत्र! रणवीर दीपिका घेतायत घटस्फोट?
कशी झाली विजय आणि संगीताच्या लव्ह स्टोरीची सुरूवात
विजय त्याची पत्नी संगीताला 'पूवे उनक्कागा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातील प्रेम मिळालं. 1996 मध्ये, चेन्नईमध्ये शूटिंग शेड्यूल दरम्यान, विजयला त्याची फॅन म्हणजेच संगीता सोरलिंगं भेटली. संगीताने विजयचा पूव उनक्कागा हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटानंतर ती विजयच्या प्रेमात पडली होती. खरंतर संगीता त्यावेळी यूकेमध्ये राहत होती आणि फक्त विजयला भेटण्यासाठी ती यूकेहून चैन्नईत आली होती. संगीता ही श्रीलंकेतील तमिळ उद्योगपतीची मुलगी होती, जी यूकेमध्ये स्थायिक झाली होती. सेटवर भेटल्यानंतर विजय आणि संगीता यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यानंतर ते एकमेकांना भेटू लागले. हळू हळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मग, विजयनं आई-वडिलांना भेटण्यासाठी संगीताला बोलावले होते. त्यानंतर संगीता आणि विजयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 25 ऑगस्ट 1999 मध्ये संगीता आणि विजयने लग्न केले. (Vijay Thalapathy Love Story)