मुंबई : वादाचा मुकुट नेहमी आपल्या डोक्यावर मिरवणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगणा रानौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती लवकरच 'थलायवी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात दिवंगत जयललिता यांची व्यक्तिरेखा बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रानौत साकारणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझनमध्ये कंगणाच्या नृत्य अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गत वर्षापासून बॉलिवूडमध्ये बायोपिक साकारण्याचे सत्र सुरू आहे. राजकारणी, खेळाडू यांच्या यशोगाथेवर बेतलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. कंगणाने 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. बॉक्स ऑफिवर चित्रपटाने चांगलीच मजल मारली आणि प्रेक्षकांची, समिक्षकांची मने जिंकली. 


जयललिता यांच्या बायोपिकचे नाव 'थलायवी' असे आहे. जयललीता यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार असून जो केवी विजयेंद्र प्रसाद यांनी चित्रपटाचे लिखाण केले. तर चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंह यांची आहे.