मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील 'ड्रग्स प्रकरण' सध्या चांगलचं गाजत आहे. या प्रकणाची साखळी दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी एनसीबी कसून चौकशी करत आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक प्रसिद्ध कलाकार आणि बॉलिवूडमधील मंडळींची नावे पुढे आली आहेत. अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री टिया वाजपेयी स्वतःची ड्रग्स टेस्ट करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केली. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये सर्वजण सारखे नसल्याचं म्हणतं ड्रग्स प्रकरणी बॉलिवूडला पाठिंबा दिला आहे. 



इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'कलाविश्वात काम करणारे काही जण ड्रग्सचं सेवन करत असतील पण सगळेच नाही. बॉलिवूड कलाकारांवर खोटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे मी स्वतःची ड्रग्स टेस्ट केली आहे.'


स्वतःचे ड्रग्स टेस्ट रिपोर्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करत तिने इतर सर्व कलाकारांना ड्रग्स टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या करिअरसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपल्यावर प्रेम करतात त्या चाहत्यांसाठी तिने सर्व कलाकारांना ड्रग्स टेस्ट करण्यास सांगितले आहे.