मुंबई : आपल्या पहिल्याच चित्रपटानंतर चाहत्यांच्या मनात घर करणारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या अनन्याने स्टार किड असल्याचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर संपूर्ण आयुष्य बदलले असल्याचे वक्तव्य अनन्याने केले आहे. त्याचप्रमाणे ती साध्या तरूणांप्रमाणे वागण्याचा सतत प्रयत्न करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या २० वर्षांमध्ये अभिनय क्षेत्रात नाव कमावलेली अनन्या आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, ''मी 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात झळकल्यानंतर माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. मोठ्या प्रमाणात आता मला जणता ओळखू लागली आहे. पण मी नेहमी साधं राहण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत फिरायला जाते. ''


अनन्या प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची कन्या आहे. एका अभिनेत्याच्या घरात जन्माला आल्यामुळे बॉलिवूडमध्ये येण्यासाठी फारशी करसत करावी लागली नसल्याचे तिने म्हटले आहे. स्टार किड असल्यामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्रीतर सहजच मिळते, पण आपल्या अभिनयात जोर नसेल तर कोणी आपल्यावर पैसे लावत नसल्याचेही तिने सांगितले.


अनन्या म्हणते की, 'मी अशा एका संधीची प्रतिक्षा करत आहे, ज्यामध्ये मला माझ्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळेल. जर आता कोणी मला ऐकत असेल, कृपया असं करा' यावेळेस तिने तिच्या वडिलांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 


अनन्या लवकरच 'पती पत्नी और वो' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्या शिवाय अभिनेता कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर देखील भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. 'पती पत्नी और वो' चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.