...म्हणून नीना गुप्ता शेअर करतात ग्लॅमरस फोटो
नीना गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात.
मुंबई : सिनेविश्वातील जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 'बधाई हो' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं. नीना गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमी त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. याबद्दल नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी 'आपल्याला इंटरनेटवर आकर्षक फोटो शेअर करायला आवडतात', असं म्हटलंय. सांगीतले. त्यामुळे चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येतात असेही त्या म्हणाल्या.
नीना यांनी २०१७ साली सोशल मीडियावर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारण्यासाठी ऑफर्स मिळाल्या होत्या. नीना गुप्ता यांचं इन्स्टाग्राम अकाउंट आकर्षक फोटोंनी भरलेले आहे. त्यांची मुलगी मसाबा हिनं बॉलिवूडमध्ये डिझायनर म्हणून एक वेगळं स्थान निर्माण केलंय. तीच आपल्या आईचेही कपडे डिझाईन करते.
चित्रपटात कमबॅक केल्यानंतर नीना म्हणाल्या की, 'मी जेव्हा दिल्लीतून मुंबईत एक अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आले तेव्हा फक्त चित्रपट होते. पण सर्वांकडे टीव्ही नव्हत्या. सुरुवातीच्या काळात मला भूमिका मिळणं फार कठीण गेलं, तेव्हा मी मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. टीव्हीने मला पैसा प्रसिद्धी आणि नाव दिले'
नीना गुप्ता पुन्हा एकदा चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. 'संदीप और पिंकी फरार', अभिनेत्री कंगना रानौतच्या 'पंगा' आणि अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटांमध्ये त्या भूमिका साकारणार आहेत.