मुंबई : फॉशनिस्टा अभिनेत्री सोनम कपूर २०१८ मध्ये उद्योगपती आनंद आहूजासोबत विवाह बंधणात अडकली. लग्नानंतर तिने सोशल मीडिया अकाउंटवर  आपल्या नावात बदल केले. तिने तिच्या नावासोबत पतीचे नाव जोडून सोनम कपूर आहूजा असे ठेवले. पण लग्नाच्या ९ महिन्यांनंतर चक्क सोनमने तिच्या नावात पून्हा बदल केले आहे. तिने फक्त तिच्या पतीचे आडनाव काढले नसून संपूर्ण नावात बदल केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अणि ट्विटर अकाउंटवर सोनम कपूर आहूजा हे नाव बदलून 'झोया सिंग सोलंकी' हे नाव ठेवले आहे. सोनम सध्या तिच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तिच्या नवीन सिनेमाचे नाव 'द झोया फॅक्टर' असे आहे. सिनेमाच्या प्रमोशन साठी सोनमने तिच्या नावात बदल केलेत. सिनेमात सोनम झोया सिंग सोलंकी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात दलकीर सलमान मुख्य भूमिकेत साकारणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत.


'द झोया फॅक्टर' सिनेमाची कथा अनुजा चौहान लिखीत पुस्तकावर आधारित आहे. सिनेमाची कथा एका राजपूत मुलीच्या आयुष्या बेतलेली आहे. जिचे नाव झोया आहे आणि ती एका जाहीरात एजन्सीमध्ये कामाला आहे.
   
नुकताच सोनमचा "एक लड़की को देखा तो ऐसा लगा'' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरला. सिनेमात अनिल कपूर, राजकुमार राव आणि जूही चावला मुख्य भूमिकेत होते.