मुंबई : ऑस्कर पुरस्कारांची सर्वत्र चर्चा सुरु अस्तानाच अखेर मोठ्या उत्साहात काही दिवसांपूर्वीच हा सोहळा पार पडला. कलाकारांचा आणि चित्रपट कलेचा गौरव करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूड कलाकारांचा झगमगाट तर होताच. पण, त्यासोबतच बाजी मारली ती म्हणजे 'पॅरासाईट' या कोरियन चित्रपटाने. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय धमाकेदार अशा या सोहळ्यात ए.आर. रेहमानच्या 'जय हो' या गाण्यानेही स्थान मिळवलं. या साऱ्यामध्ये एका चेहऱ्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एमिनेमच्या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच दुसरीकडे या चेहऱ्याचं ऑस्करच्या मंचावर दिसणं भारतीयांना विशेष थक्क करणारं होतं. कारण, एमिनेमच्या सादरीकरणानंतर एका भारतीय वंशाच्या आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राशी नातं असणाऱ्या कलाकाराने त्याची कला सादर केली. या भारतीय- अमेरिकन रॅपरचं नाव आहे उत्कर्ष अम्बुडकर. त्याने Oscars 2020च्या मंचावर स्वत: लिहिलेलं रॅप ऐकवलं. 





न्यूयॉर्कमधील टिस्क स्कूल ऑफ आर्टमधून उत्कर्षने अभिनयाचं शिक्षण घेतलं. पण, तरीही त्याने या क्षेत्रात पुढे न जाता रॅपिंग क्षेत्रातच नावलौकिक मिळवलं. काही संकेतस्थळांच्या वृत्तानुसार जीवनातील संघर्षाच्या काळात असताना आणि व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतर एका रॅप ग्रुपसह काम करण्याची संधी त्याला मिळाली. या ग्रुपसोबत काम केल्यानंतर २०१९ मध्ये ब्रॉडवे येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमातून तो प्रसिद्धीझोतात आला. 


Oscars 2020 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी 



पाहता पाहता उत्कर्षने या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख तयार केली. त्यातच आता थेट ऑस्करच्या मंचावर त्याची कला पाहायला मिळाल्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो काय किमया करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.