Oscars2020 : ऑस्करच्या व्यासपीठावर रेहमानचं `जय हो`
यंदा ऑस्कर सोहळ्यात अशी वाढली देशाची शान
मुंबई : काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाविश्वाचा नाद गुंजला होता. निमित्त होतं ते म्हणजे संगीतकार ए.आर. रेहमान आणि Slumdog Millionaire हा चित्रपट. ९२व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही भारताची हीच शान पाहायला मिळाली. यंदा निमित्त ठरलं Slumdog Millionaireमधील 'जय हो' हे गाणं.
९२वा ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरु असतेवेळी 'जय हो' हे गाणं वाजलं आणि भारताची शान पुन्हा एकदा वाढली. एका नव्या अंदाजात हे गाणं सादर करण्यात आलं. ज्यासाठी जगभरातून भारतीय संगीतकलेचीही वाहवा केली जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या Oscars2020च्या मुख्य पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान 'फुट टॅपिंग' प्रकारात 'जय हो' हे गाणं सादर केलं गेलं. मुळ गाण्यात काही बदल करत हा नवा अंदाज सादर करण्यात आला. गेल्या दहा वर्षांमध्ये साकारण्याच आलेल्या आणि ऑस्कर मिळवलेल्या मुळ गाण्यांना यावेळी सादर केलं गेलं. ज्यामध्ये भारतीय कलाकारांच्या कलेचाही समावेश होता.
Oscars 2020 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
अमेरिकन संगीतकार, गीतकार लीन-मॅन्युअल मिरँडा यांनी हे मोंताज सादर केलं. ज्यामध्ये 'स्लमडॉग मिलियनेअर', 'टायटॅनिक' आणि 'वेन्स वर्ल्ड' अशा चित्रपटातील गाणी सादर करण्यात आली. अर्थातच इतक्या मोठ्या व्यासपीठावर पुन्हा एकदा 'जय हो' वाजणं ही बाब अतिशय गौरवास्पदच आहे.
Oscars2020 : ऑस्करच्या मानचिन्हाची किंमत अवघी ७० रुपये; पाहा कसं आहे हे गणित?
भारतीय कलाकारांच्या कलाकृतीचं हे नवं रुप अनेकांसाठी अनपेक्षित आणि तितकंच आनंद देणारं होतं. दरम्यान यंदाच्या वर्षी ऑस्कर पुरस्कारांवर 'पॅरासाईट' या चित्रपटाचं वर्चस्व पाहायला मिळालं. या कोरियन कलाकृतीने सर्वोत्कृष्ट चित्रपटाता बहुमानही मिळवला. या चित्रपटाने विविध विभागातील एकूण चार पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.