मुंबई : ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 'The Accidental Prime Minister'हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. असं असतानाही आता सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज झाला आहे. या सिनेमामुळे बॉलिवूड ते राजकारणापर्यंत सगळीकडे जोरदार चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

The Accidental Prime Minister या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर खूप व्हायरल झाला होता. आता या सिनेमाचं आणखी एक पोस्टर रिलीज झालं आहे. 


ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्शने या पोस्टरला सोशल मीडिया वॉलवर शेअर केलं आहे. आधीच्या पोस्टरमध्ये अनुपम खेर यांचा साइड लूक दिसत होता. पण आताच्या पोस्टरमध्ये अनुपम खेर पंतप्रधान पदाची शपथ घेताना दिसत आहे. 


या पोस्टरमध्ये अनुपम हात जोडून दिसत आहे. त्यांच्या डोळ्यात देशासाठी बघितलेले अनेक स्वप्न दिसत आहेत. 



 मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ सलग दहा वर्षे पंतप्रधान पदावर कार्यरत होते. युपीए १ आणि युपीए २ या दोन्ही सरकारांचे नेतृत्त्व त्यांनी केले होते. त्याचा हा दहा वर्षांचा कार्यकाळ सरकारवरील विविध आरोपांमुळे गाजला होता. 


त्या पार्श्वभूमीवर याच कार्यकाळावर आधारित सिनेमा येत असल्यामुळे सिनेरसिकांमध्ये त्याची बरीच चर्चा आहे. 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमामध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका अभिनेते अनुपम खेर यांनी साकारली आहे. 


ट्रेलरमधून अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची प्रतिमा हुबेहूब साकारली असल्याचे बघायला मिळते. संजय बारू यांनी 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हे पुस्तक लिहिलेले आहे. याच पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे.


 या सिनेमाप्रकरणी मुजफ्फरपूर सीजेएम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारदार सुधीर ओझा यांनी म्हटले आहे.


या प्रकरणी तक्रारदाराने सिनेमातील अभिनेते अनूपम खेर यांच्याव्यतिरिक्त सिनेमा निर्माता आणि निर्देशक यांच्या सहित 14 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे.