Actress who is away fron Industry for 12 Years : तुम्हाला सगळ्यांना बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटात भूमिका साकारणारी अंजला जावेरी आठवते का? अंजलानं काजोलच्या मैत्रिणीची भूमिका तिनं साकारली होती, तर तिच अरबाज खानच्या प्रेमिकाच्या भूमिकेत दिसली. अंजला जावेरीनं आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली. पण तिथे तिला तिचं स्थान निर्माण करता आलं नाही. अंजला जावेरी ही गेल्या 12 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तर इतक्या वर्षात अंजाला कुठे गेली आणि ती काय करते? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजला जावेरीला विनोद खन्ना यांनी लॉन्च केलं होतं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी मुलगा अक्षयला लॉन्च केलं. त्यासाठी त्यांनी अनेक देशांमध्ये टॅलेन्ट हंट ठेवलं आणि त्यावरुनच इंग्लंटमध्ये लहाणाची मोठी झालेली अंजली जावेरी त्यांना भेटली. त्यानंतर त्यांनी तिला देखील बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. 



इंग्लंडमध्ये लहाणाची मोठी झालेली अंजला जावेरीला भारत खूप आवडायचं. तर 2021 मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत अंजला जावेरीनं सांगितलं की ती आणि तिचं कुटुंब कसं लंडनमध्ये असताना एका छोट्याश्या पाकिस्तानी दुकानातून व्हिडीओ घेऊन यायचे आणि घरी पाहायचे. तेव्हा अंजला जावेरीला ग्लॅमरचं जग आवडू लागलं होतं. पण त्यावेळी ती शिक्षणावर लक्ष देत होती. 


1997 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अंजला जावेरीनं त्याच वर्षी तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ती दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये काम करु लागली. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ती सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ठरली, तर दुसरीकडे ते बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करु शकली नाही आणि गायब झाली. एकीकडे तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरला तर दुसरीकडे तिचा पहिला दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर जब प्यार किया तो डरना क्या' यामुळे अंजलाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण या चित्रपटात अंजला ही सह-कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यातील 'तेरी जवानी बडी मस्त मस्त है' या गाण्यामुळे अंजलाची लोकप्रियता वाढली होती. 


हेही वाचा : 500 कोटींचं बजेट असणाऱ्या 'पुष्पा 2' नं प्रदर्शनाआधीच कमावले 1200 कोटी? अल्लू अर्जुनचा नवा रेकॉर्ड


दाक्षिणात्य चित्रपटात काम करत असताना अंजला जावेरीची भेट तरुण अरोराशी झाली. यावर तरुण मॉडेलिंग देखील करत होती. तरुण तिच आहे. त्यानं 'जब वी मेट' मध्ये करीना कपूरच्या बॉयफ्रेंड म्हणजेच अंशुमानची भूमिका साकारली होती. खरंतर बॉलिवूडमध्ये तो काही खास करु शकत नसला तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक खलनायक म्हणून त्याला चांगली पसंती मिळाली.  तरुणनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला आणि अंजलाला फिरण्याची हौस आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आहे की त्यांना आयुष्यभर जग फिरायचं आहे. तरुण नेहमीच त्यांच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.