मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन लवकरच अभिनेता अजय देवगन सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे अभिनेता रणबीर कपूर देखील चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. दिग्दर्शक लव रंजन त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्याच्या चित्रपटात अजय, रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय दीपिका अजयच्या प्रेयसीची भूमिका साकारणार असल्याचे समोर येत आहे. याआधी 'दे दे प्यार दे' चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रितने त्याच्या प्रेयसीची भूमिकेला न्याय दिले. तर लव रंजन यांच्या आगामी चित्रपटातील अजय-दीपिका ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस पडेल की नाही हे पाहाणं मजेशीर ठरणार आहे. 


दीपिका सध्या तिच्या 'छपाक' चित्रपटात व्यस्त आहे. त्यानंतर ती '८३' चित्रपटात अभिनेता रणवीरच्या ऑनस्क्रिन पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणबीर त्याच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे अजय 'तानाजी: द अनसंग वॉरियर', 'सूर्यवंशी', 'भुज: द प्राइड', 'मैदान' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.