मुंबई : यावर्षाची सुरूवात झाली ती प्रिया वारियरच्या शालेय व्हिडिओने. या व्हिडिओने सगळीकडे धुमाकूळ घातला. शालेय कपड्यातील त्या मुलीच्या अदा सगळ्यांनाच घायाळ करण्याऱ्या होत्या. त्यानंतर प्रिया वारियर कायमच चर्चेत राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्याळम ब्युटी असलेली प्रिया प्रकाश वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या फोटोशूटमुळे. चक्क बाथटबमध्ये बोल्ड अंदाजात फोटोशूट करून इंटरनेटवर पुन्हा एकदा प्रियाने सनसनी पसरवली आहे. 


प्रियाने आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या फोटोतील प्रत्येक लूकमध्ये एक वेगळाच अंदाज आहे. या फोटोशूटमध्ये ती कधी बेडवर तर कधी बाथटबमध्ये दिसत आहे. 



बाथटबमधील मोहक अंदाज 


प्रियाचं हे बाथटबमधील फोटोंनी तर कमालच केली आहे. प्रिया या बाथटबमध्ये चेक्सच्या ड्रेसमध्ये खूप मोहक दिसत आहे. प्रियाची नजर या फोटोतही बोलत आहे.


अगदी याच वर्षाच्या सुरूवातीच्या तिच्या डोळ्यातील निरागसता आता एका मॅच्युअल मुलीप्रमाणे बदलली आहे. आपल्या नजरेने घायाळ करणं ती काही सोडत नाही. 



प्रिया प्रकाश वारियर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप ऍक्टिव असते. आपल्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ ती यावर शेअर करताना दिसते. 


मल्याळम सिनेमा 'ओरू अदार लव' हा सिनेमा देखील या वर्षी रिलीज होणार आहे. याच सिनेमातील एका क्लिपमुळे ती चर्चेत आली होती. 



गुगलवर सर्वाधिक सर्च होणारी व्यक्ती 


नुकतीच गुगलकडून भारतात सर्वाधिक सर्च झालेल्या व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंबर आहे. 10 व्या क्रमांकावर तैमूर अली खानचं नाव आहे. या यादीत आठव्या क्रमांकावर प्रिया प्रकाश वारियरचा नंबर लागला आहे.