मुंबई : 'मिर्झापूर' वेब सीरिजमध्ये 'कालिन भैया' ही भूमिका साकारून खळबळ उडवणारा अभिनेता पंकज त्रिपाठी आज प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटामध्ये कोणत्याही गंभीर परिस्थितीत आपल्या विनोद बुद्धीने परिस्थिती हाताळणाऱ्या पंकज यांच्या चाहत्यांनी संख्या फार मोठी आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी अनेकांचे मन जिंकले आहे. पंकज आज यशस्वी अभिनेता असला तरी तो एक फॅमेलीमॅन आहे. तो कायम त्याच्या कुटुंबाला झगमगत्या विश्वापासून दूर ठेवतो. पण सध्या त्याच्या मुलीचे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंकज त्रिपाठी यांच्या मुलीचं नाव आशी त्रिपाठी असं आहे. आशी दिसायला अत्यंत सुंदर आहे. सध्या सोशल मीडियावर आशीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता कालिन भैय्याची नाही तर त्याच्या मुलीचं कौतुक होत आहे. आशी तिच्या वडिलांची कार्बन कॉपी आहे... असं पंकजच्या चाहत्यांचं मत आहे. 



पंकज त्रिपाठीचा विवाह  15 जानेवारी 2004 रोजी मृदुलाशी झाला होता. मृदुला व्यवसायाने शिक्षिका आहेत. जेव्हा पंकज मुंबईत आला, तेव्हा मृदुला यांनी पंकजची प्रत्येक पायरीवर साथ दिली. त्यामुळे आज कलाविश्वाला एक नवा चेहरा मिळाला आहे. अर्थातचं 'प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते...' हा विचार याठिकाणी देखील साध्य झालं.