मुंबई : एक काळ असा होता जेव्हा दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे. . दोघांनाही लग्न करायचं होतं पण त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आणि  हे जाणून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या ब्रेकअपनंतर दीपिकाला याचा खूप त्रास झाला आणि ती डिप्रेशनमध्ये गेली.  यानंतर कतरिना कैफने रणबीरच्या आयुष्यात एंट्री घेतली. दीपिका आणि रणबीरच्या विभक्त होण्यामागे कतरिना कारणीभूत असल्याचं मानलं जातं. पण कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपमागे दीपिका पदुकोण कारणीभूत होती का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीर कपूरने दीपिकाला कतरिना कैफसाठी सोडलं. पण कतरिनाला 6 वर्षे डेट केल्यानंतर त्यांच्यातही खटके उडू लागल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आणि अखेर 2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. दोघांच्या विभक्त होण्यामागे अनेक कारणं मोजली गेली आणि त्यातलं एक कारण दीपिका असल्याचं सांगण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रेकअपनंतर दीपिका आणि रणबीर 2015 मध्ये तमाशा चित्रपटासाठी एकत्र आले होते. तेव्हा दोघं पुन्हा जवळ आल्याच्या बातम्या चर्चेत आल्या. यामुळे कतरिना खूपच नाराज झाली होती.


याशिवाय आणखी एक कारण होतं जे कदाचित त्यांच्या ब्रेकअपमागचं कारण बनलं.  ते कारण म्हणजे दीपिका आणि रणबीरमधील चांगलं बाँडिंग. ब्रेकअप आणि त्यानंतरच्या डिप्रेशननंतरही, दीपिका आणि रणबीर चांगले मित्र राहिले, दोघांनी कधीही एकमेकांकडे पाठ फिरवली नाही आणि कदाचित याचाच कतरिनाला सर्वात जास्त त्रास झाला.



कतरिना आणि रणबीरची प्रेमकहाणी 2009 साली अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातून सुरू झाली होती. ज्यामध्ये दोघांनी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. पण 2016 मध्ये दोघं वेगळे झाले आणि त्याआधीच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. आज जिथे रणबीर आणि दीपिका एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तिथे कतरिना आणि रणबीर एकमेकांकडे बघतदेखील नाहीत.