ही सीरीज आईएमडीबीवर जगातली चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज
जर तुम्ही ही या सिरीजचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
मुंबई : मनोज बाजपेयी, शारिब हाशमी आणि सामंथा अक्किनेनी स्टारर वेब सीरीज 'द फॅमिली मॅन 2' या सिरीजला लोकांची बरीच पसंती मिळत आहे. या वेब सिरीजने सगळे रेकॉर्ड मोडत जगात लोकप्रियतेच्या यादीत चौथ स्थान मिळवलं आहे. जर तुम्ही ही या सिरीजचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.
'द फॅमिली मॅन 2'ने तोडलं रेकॉर्ड
'द फॅमिली मॅन 2'ने एक नवं रेकॉर्ड बनवलं आहे. ही सीरीज आईएमडीबीवर जगातली चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज ठरली आहे. सीरीजला आईएमडीबीवर 10 पैकी 8.8 स्टार्स मिळाले आहेत. या रेटिंग बरोबरच ही सिरीज जगातली टॉप 5मध्ये सर्वात जास्त रेटिंग वाली वेब सीरीजमध्ये सामिल झाली आहे.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय शो
'द फॅमिली मॅन 2' ही सिरीज चौथ्या क्रमांकावर आहे. या सिरीजनं लोकप्रिय फ्रेंन्ड्स, ग्रेज एनाटोमी सारख्या सीरीजला मागे टाकलं आहे. 'फॅमिली मॅन 2' नंतर लोकी, स्वीट टूथ आणि मियर ऑफ ईस्टटाउन या सिरीज आघाडीवर आहेत. ही माहिती राज आणि डीके या सिरीजचे निर्माते यांनी ट्विट करत दिली आहे. राज आणि डीके यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'द फॅमिली मॅन 2 जगातील सर्वाधिक लोकप्रिय शो बनला आहे.'
नुकतीच रिलीज झालेली मनोज बाजपेयी स्टारर वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' ने लोकांना वेड लावलं आहे. सध्या दुसर्या सीझनची क्रेझ कमी झालेली नाही आणि निर्मात्यांनी याच्या तिसर्या सीझनची म्हणजेच 'द फॅमिली मॅन 3' ची तयारी सुरू केली आहे. त्याच्या आगामी सीझनमध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीच्या एन्ट्रीची माहिती समोर आली आहे
विजयाचे पात्र काय असेल
एका वृत्तानुसार, या सिरीजचा तिसरा सिझन अजून धमाकेदार बनण्याच्या तयारीत आहे. यासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी द फॅमिली मॅन 3'च्या खलनायकाच्या पात्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या भूमिकेसाठी तामिळ सिनेमा स्टार विजय सेतुपती याला अप्रोच केलं गेलं आहे. 'द फॅमिली मॅन 3'च्या मेकर्सने विजयला साईन केलं आहे.