मुंबई : 'द फॅमिली मॅन' (The Family Man) या वेब सीरिजला मिळालेल्या यशानंतर आता चाहते सीझन 3 ची प्रतिक्षा करत आहेत. हे पाहताच निर्मात्यांनी सीझन 3 ची निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. या दरम्यान, मनोज वाजपेयी यांनी मालिकेबाबत एक मोठी अपडेट शेअर केली आहे. 'द फॅमिली मॅन 3 कास्ट'च्या या अपडेटनं चाहत्यांना धक्काबसला आहे. (The Family Man 3 Cast) 


पाहा काय म्हणाले मनोज वाजपेयी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, 'द फॅमिली मॅन 3' मध्ये बरेच नवे चेहरे पाहायला मिळणार आहे. तर निर्मात्यांना काही पात्र बदलायची आहेत. अशात चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे की त्यांचे आवडते मनोज वाजपेयी हे या शोचा भाग असतील की नाही. मात्र, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की मनोज वाजपेयी या सीरिजमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. मनोज वाजपेयीसोबत (Manoj Bajpayee)  प्रियामणी (Priyamani) आणि शरीब हाश्मी (Sharib Hashmi) देखील सीझन 3 मध्ये दिसणार आहेत. (Manoj Bajpayee Web Series) 


हेही वाचा : Shubman Gill सोबत अफेअरच्या चर्चा रंगताचं सारा का लपवते चेहरा? Video Viral


मनोज यांनी नुकतीच या विषयी एक मोठी अपडेट शेअर केली आहे. मनोज यांनी सीझन 3 बद्दल पुष्टी दिली आहे. सध्या फॅमिली मॅनचे दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डीके इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. पुढील वर्षांच्या सुरुवातीला दोघेही फॅमिली मॅन सीझन 3 च्या शूटिंगला सुरुवात करू शकतात.  (The Family Man 3 Release Date)