मुंबई : तो हिरोच काय जो खलनायकाशी भिडत नाही आणि जिंकत नाही. फायटिंग सीननंतर जेव्हा हिरो जिंकतो तेव्हा सिनेमाघरात शिट्ट्यांचा आवजा येवू लागतो. एकवेळ अशी होती जेव्हा लोकं हिरोला देव आणि खलनायकाला दुश्मन मानायचे. पण गेल्या काही वर्षांत ही विचारसरणी खूप बदलली आहे. आता 'एनिमल'ला घ्या ज्यामध्ये रणबीर पेक्षा ज्यास्त खलनायक बॉबी देओलला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता एनिमलनंतर फायटर सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हा हिृतिक रोशनपेक्षा जास्त चर्चा त्या अभिनेत्याची होतेय जो या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ऋषभ साहनी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 
ट्रेलर समोर येताच अभिनेत्याचे लाल डोळे, हातात बंदूक आणि ताबडतोब फायरींग करणारा हा खलनायक खूपच क्रूर दिसतोय. हा अभिनेता ट्रेलरमध्ये इतका क्रूर दिसतोय की, सिनेमात काय करेल याची कल्पना करा. ट्रेलर आल्यानंतर प्रत्येकाने ऋषभबद्दल गुगलवर सर्च करण्यास सुरुवात सुरुवात केली आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की या रोलसाठी त्याने किती फिस आकारली आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायटर रिलीज झाल्याची माहिती मिळताच ऋतिक, दुसरा दीपिका, अनिल कपूर हे तीन कलाकार सतत चर्चेत आहेत. एवढ्या मोठ्या स्टारकास्टसमोर कोणी कायच दुसऱ्यांबद्दल बोलेल. पण जसा सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला तशी या खलनायका  ऋषभ साहनी ची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे.


मुख्य म्हणजे या अभिनेत्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. याआधी काही वेबसिरीजमध्ये दिसला होता. 'द एम्पायर'मध्ये तो बाबरचा भाऊ महमूदच्या भूमिकेत दिसला होता. तर वेबसिरीजमध्ये तो क्रूचा हिस्सा देखील बनला आहे. आता या सिनेमात त्याने किती फिस आकारली याबद्दलही चर्चा आहे. काहींचे म्हणणं आहे की, या अभिनेत्याला या सिनेमासाठी 20-25 लाख फी मिळत आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, त्याने या सिनेमासाठी सुमारे 12-15 लाख रुपये फी आकारली आहे.


किती आहे हृतिक-दीपिकाची फी?
असंही म्हटलं जात आहे की, या सिनेमासाठी हृतिक रोशनला या चित्रासाठी 50 कोटी रुपये तर दीपिका पदुकोणला 16 कोटी रुपये मिळत आहेत. 250 कोटी रुपये बजेट या सिनेमाचं असल्याचं म्हटलं जात आहे. तर एनिमलनंतर   अनिल कपूरच्या फीमध्ये वाढ झाली आहे. तर अनिल कपूर या सिनेमासाठी 7-10 कोटी रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे. तर बाकीच्या स्टार्सना जवळपास एक कोटी रुपये फी मिळत आहे.


या सिनेमाचंचित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हृतिक रोशनचा 'फाइटर' 25 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.  या सिनेमाचं 20 जानेवारीपासून  अॅडव्हान्स बुकिंगही सुरू होत असल्याचं समोर आलं आहे.