मुंबई : जेनिफर विंगेटने छोट्या पडद्यावर अनेक भूमिका केल्या आहेत. जेनिफर बाल कलाकार म्हणून बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. वयाच्या 10 व्या वर्षी 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती वयाच्या 12 व्या वर्षी 'राजा की आयेगी बारात' चित्रपटात दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक मोठ्या स्टार्ससोबत ती बालकलाकार म्हणून दिसली आहे. जेनिफर विंगेटने ऐश्वर्या राय बच्चन, राणी मुखर्जी, आमिर खान, मनीषा कोईराला यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम केलं आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या 'कुछ ना कहो' या चित्रपटात ती पूजाच्या भूमिकेत दिसली होती.


ती लहानपणापासून टीव्हीवरही काम करतेय. सरस्वतीचंद्रमधील कुमुद देसाई, बेहदमधील माया मेहरोत्रा ​​आणि बेपन्नहमधील झोया सिद्दीकी यांच्या भूमिकांमध्ये 36 वर्षीय जेनिफर विंगेटला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.  बेहादनंतर ती बेहद २ च्या सिक्वेलमध्येही दिसली. यामध्ये तिचे सहकलाकार आशिष चौधरी आणि शिवीन नारंग होते. जेनिफर आता वेब सीरिजमध्येही काम करत आहे.


वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाले तर तिचा जन्म मुंबई झाला. तिच्या वडिलांचे नाव हेमंत विंगेट आणि आईचे नाव प्रभा विंगेट आहे. तिचे वडील रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे. त्याच्या मोठ्या भावाचं नाव मोझेस विंगेट आहे.



2005 मध्ये तिने तिचा को-स्टार करण सिंग ग्रोव्हरला डेट करायला सुरुवात केली. 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही शोच्या सेटवर त्यांची भेट झाली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ९ एप्रिल २०१२ रोजी करण आणि जेनिफर दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या 2 वर्षानंतर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.