मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे . त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार देखील सतर्क झालं आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे यंत्रणा कमी पडत असल्याचं दिसून येत आहे.महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा  परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अभिनेते सतिश कौशिक यांनी लहान मुलांची काळजी सरकारने घ्यायला हवी अशी मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सरकारला आवाहन केलं आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुलांवर सरकारने विशेष लक्ष द्यायला हवं आहे. ९ वर्षांखालील मुलं आई-वडिलांशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे जास्त बेडची सुविधा करणं अत्यावश्यक आहे. लहान मुलं कोरोनाच्या जाळ्यात सापडत आहेत. ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. 



मुंबईमध्ये मुलांसाठी वाडिया आणि एसआरसीसी रूग्णालयं आहेत. पण बोरिवली, अंधेरी भागातील मुलांना रूग्णालयापर्यंत लवकर पोहोचणं फार कठीण आहे. मुलांवर योग्य देखरेखीखाली उपचार होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे सरकारने याबद्दल योग्य ते निर्णय घेतले पाहिजे. असं सतिश कौशिक यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 


दरम्यान, सतिश यांच्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मुलीची प्रकृती आता उत्तम आहे. स्वतःच्या मुलीला कोरोना झाल्यानंतर लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होणं फार गंभीर बाब असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सतिश यांची मुलगी 8 वर्षांची असून  तिचं नाव वनिष्का असं आहे.