मुंबई : सध्या गोव्यात 54 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पार पडतोय. यासाठी अभिनेता सनी देओल सध्या गोव्यात आहे. नुकताच काही दिवसांपुर्वी 'गदर 2' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडित काढले आहेत. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सगळीकडे 'गदर 2'ची जोरदार चर्चा होती. आता या अभिनेत्याने आपल्या फिल्मी करिअरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. हे सांगत असताना अभिनेता मात्र खूप ईमोशनल झाला आहे. यावेळी तो म्हणाला, गदरच्या यशानंतर त्याचा खरा संघर्ष सुरु झाला होता. कारण तेव्हा त्याला कोणतेच सिनेमा मिळत नव्हते. कोणीच कोणत्या स्क्रिप्ट त्याला ऑफर करत नव्हते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sunny Deol ने फिर डायरेक्टर राहुल रवैलचं कौतुक केलं आणि सांगितलं की, जेव्हा या  त्या कठीण काळात मला त्यांनी मदत केली आणि मला चित्रपटांची ऑफर दिली. सुप्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तो स्वत:ला भाग्यवान समजतो, असे सनी देओलने सांगितलं.


याविषयी बोलताना सनी देओलने सांगितलं की, मी राहुल रवैलसोबत सुरुवात केली. त्याने मला खूप सुंदर सिनेमा दिले आहेत. कशात काम केलं कशात नाही केलं. मात्र ते सिनेमा लोकांच्या आजही लक्षात आहेत. मी माझ्या सिनेमांमुळे उभा आहे. 'गदर'नंतर जो एक मोठी हिट होती. माझं स्ट्रगल सुरु झालं होतं कारण मला स्क्रिप्ट ऑफर येत नव्हत्या. काहीच होत नव्हतं. मध्यंतरी मी काही सिनेमा केले. त्यात २० वर्षांचं अंतर होतं. मात्र मी हार नाही मानली. मी कायमच पुढे जात होतो. मी सिनेमात यासाठी आलो कारण मला एक्टर बनायचं होतं. स्टार नाही. मी माझ्या वडिलांचे सिनेमा पाहिले आहेत आणि मलादेखीलं तसेच सिनेमा करायचे आहेत. 
 


सनी देओलला कोसळलं रडू
यावेळी दिग्दर्शक राजकुमार संतोषीदेखील तिथे हजर होते. ते देखील त्याच्या या वागणूकीमुळे हैराण झाले. याविषयी बोलताना तो म्हणाला, 'माझा विश्वास आहे की, इंडस्ट्रीने सनीच्या क्षमतेला आणि प्रतिभेला न्याय दिला गेला नाही. पण देवाने न्याय केला आहे. हे ऐकून सनी देओलच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो रडू लागला. आज दिग्दर्शक राजकुमार संतोषी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 
 
 अनिल शर्मा दिग्दर्शित, हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झाला. सनी देओल स्टारर 'गदर 2' देखील इफ्फी 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. या सिनेमानेन शभरात 525.7 कोटी रुपये आणि जगभरात 686 कोटी कमावले.