मुंबई : भारतीय गोल्फर आणि शिकारी ज्योती रंधावा आणि त्याच्या साथीदाराला अवैध शिकार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक रायफल आणि रंधावाकडून जंगली कोंबडी आणि रानडुक्कराचं कातडं जप्त करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योती रंधावाला हा त्याच्या शिकारीच्या छंदासाठी प्रसिद्ध आहे. यवतमाळमध्ये अवनी वाघिणीच्या शोधासाठी रंधावा आणि त्याच्या शिकारी कुत्र्यांना घेऊन जंगलातही गेला होता. पण चार दिवस शोध घेतल्यावरही त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. 


ज्योती रंधावाचं बॉलिवूड कनेक्शन देखील आहे. बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह ही ज्योती रंधावाची घटस्फोटीत पत्नी आहे. 2014 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. 


ज्योती रंधावा आणि चित्रांगदाची लव्हस्टोरी 


ज्योती रंधावा आणि चित्रांगदा यांना एक मुलगा असून त्याची कस्टडी चित्रांगदाकडे आहे. चित्रांगदा आणि ज्योती रंधावा या दोघांचेही वडिल भारतीय सेनेत एकाच रेजिमेंटमध्ये होते. 


गोल्फरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, चित्रांगदाची पहिल्यांदा एका अभिनेत्रीच्या घरी भेट झाली होती. तेव्हा चित्रांगदा आठवीत शिकत होती तर मी शाळेत शेवटच्या वर्षात शिकत होता. 


मात्र चित्रांगदा दिल्लीत गेल्यानंतर त्यांच्या प्रेमात वाढ झाली. ज्योतीच्या वडिलांची त्याच शहरात बदली झाली होती. त्याचवेळी ज्योती देखील तिकडे निघून गेला. 


चित्रांगदा दिल्लीत गेल्यावर त्यांच्यात अधिक प्रेम वाढलं. पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 2001 मध्ये लग्न केलं. 


चित्रांगदाने बॉलिवूडमध्ये डेब्यू सुधीर मिश्रा यांच्या 'हजारो ख्वाहिशे ऐसी' या सिनेमातून केलं आहे. त्यावेळी ती विवाहित होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरच ज्योती आणि चित्रांगदा यांच्यात खटके उडायला सुरूवात झाली. 


ज्योतीने पुढे सांगितलं की, आम्ही एकत्र नसणं हे मला खूप त्रासदायक होतं. कारण चित्रांगदा कामामुळे बऱ्याचदा मुंबईतच असायची आणि मी दिल्लीत. मी खूप प्रयत्न करायचो की आम्हाला एकत्र वेळ घालवता येईल. मला त्याकाळात तिची कमतरता खूप जाणवत असे. तिच्याशिवाय घर अगदी रिकामं वाटायचं. 


2013 मध्ये ज्योती आणि चित्रांगदा यांच्यातील नात्यासंबंधी अनेक अफवा समोर आल्या. त्यांच्या नात्यात काहीच आलबेल नसल्याचं म्हटलं जातं होतं पण चित्रांगदाने या सगळ्या गोष्टी नाकारल्या होत्या. 


अखेर 2014 मध्ये चित्रांगदा आणि ज्योतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मुलाची जबाबदारी चित्रांगदाकडे सोपवण्यात आली.