मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या एका जुन्या एपिसोडमध्ये कोर्टाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो' चे निर्माते अडचणीत आले आहेत. जुन्या एपिसोडमध्ये दाखवलेल्या एका सीनवरून हा शो वादात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या जिल्हा न्यायालयात 'द कपिल शर्मा शो'च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ही तक्रार त्या दृश्याशी संबंधित आहे ज्यामध्ये कोर्ट रूमचे दृश्य दाखवण्यात आले होते. या दरम्यान कलाकारांना दारू पिलेले दाखवण्यात आले. असे केल्याने अभिनेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे.


तक्रारीत वकिलाने म्हटले आहे की, सोनी टीव्हीवर दाखवलेला 'द कपिल शर्मा शो' निकृष्ट दर्जाचा आहे. यामध्ये महिलांवर चुकीच्या कमेंट केल्या जातात. एका एपिसोडमध्ये, स्टेजवर एक कोर्टरूम उभारण्यात आला होता, ज्यात असे दर्शवण्यात आले होते की कलाकार प्रेक्षकांमध्ये बसून मद्यपान करत होते. हा न्यायालयाचा अपमान आहे.


हे संपूर्ण प्रकरण गेल्या वर्षी 19 जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या एका एपिसोडशी संबंधित आहे, 24 एप्रिल 2021 रोजी, त्या एपिसोडचे पुन्हा टेलिकास्ट केले गेले. त्याच्याशिवाय, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी, किकू शारदा आणि अर्चना सिंह सारखे कलाकारही कपिल शर्मा शोमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दिसतात. लॉकडाऊन दरम्यान हा शो बंद करण्यात आला होता, त्यानंतर त्याचा नवीन हंगाम 21 ऑगस्टपासून सुरू झाला.