मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नुकताच नोराचा 'द कपिल शर्मा शो'मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका चाहत्याने नोराच्या बेली डान्सला चांगलीच टक्कर दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा फतेहीचा हा व्हिडिओ 'द कपिल शर्मा शो'च्या फॅन पेजने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'दिलबर...' या गाण्यावर नोरासोबत एक चाहता बेली डान्स करताना दिसतोय. नोरासोबत अभिनेता विकी कौशल आणि कॉमेडी किंग कपिल शर्माही थिरकताना दिसतोय.



नुकतंच, नोरा फतेही आणि विकी कौशल ही जोडी रोमॅन्टिक 'पछतायोगे...' या म्युजिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 



नोरा फतोही आगामी 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. विकी कौशल सध्या करण जौहरच्या आगामी 'भूत' आणि 'तख्त' चित्रपटांसाठी काम करत आहे. तसंच विकी आगामी 'उधम सिंह' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.