Vivek Agnihotri: काही दिवसांपूर्वी 'द कश्मीर फाईल्स' सिनेमा चांगलाच गाजला होता. कश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा हा (The Kashmir Files) सिनेमा वादात देखील राहिला. त्यावेळी विवेक अग्निहोत्री हे नाव अनेकांच्या माहिती झालं. अशातच आता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी बॉलिवूडमधील सर्वात धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी अग्निहोत्री यांनी थेट बिग बी (Amitabh Bachchan) यांच्यावर आरोप लगावले आहेत. (the kashmir files director vivek agnihotri reacted on nepotism says amitabh bachchan is a mafiya)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉफी विथ करणच्या (Coffee with Karan) इपिसोडनंतर नेपोटिझमच्या (Nepotism) चर्चेने वेग धरला आणि अनेकांनी बॉलिवूडच्या स्टार कलाकारांवर आरोप केले. अशातच एका कार्यक्रमात बोलताना विवेक अग्निहोत्री यांनी विवेक अग्निहोत्री यांना माफिया म्हणत हिणावलं आहे. त्याचबरोबर मी स्वत:ला बॉलीवूडचा भाग नाही, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


बॉलिवूडमध्ये 2000 सालानंतर नेपोटिझमला सुरूवात झाली. तोपर्यंत नेपोटिझम नावाचं वादळ इंडस्ट्रीमध्ये नव्हतं, असं विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत. श्रीदेवी, अमिताभ बच्चन आऊटसाईडर आहेत. पण यांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये (Bollywood Nepotism) पाय ठेवताच यांनी आपापसात मिळून माफिया गँग बनवली, असंही विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.


पुढे बोलताना अग्निहोत्री म्हणाले की, "2000 नंतर बॉलिवूडमधील कुटुंबांनी बाहेरून येणाऱ्यांसाठी दरवाजे बंद केले. हुशार कलाकारांना बर्बाद करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. कलेचा दर्जा घसरतोय, त्याचं कारण देखील हेच आहे. चांगल्या कलाकारांना मागे रहावं लागतंय."


‘Sacred Games’ मध्ये बोल्ड सीननं धुमाकूळ घालणारी 'ही' अभिनेत्री सध्या काय करतेय?


दरम्यान, धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा सगळेच आऊटसाइडर होते. माधुरी दिक्षित देखील आऊटसाईडर आहेत. निर्माते आणि दिग्दर्शकांची मुले देखील आऊटसाईडर आहेत. मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. परंतू, जेव्हा अयोग्य गोष्टींना महत्त्व दिलं जातं त्यावेळी मला राग येतो, असं अग्निहोत्री म्हणाले आहेत.