मुंबई : सध्या सर्वत्र  'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमा पाहून अनेकांना गहीवरून देखील आलं. प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमा राज्य करत आहे. 11 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' सिनेमाने 2 सिनेमाने 200 कोटींचा गल्ला पार केल्यानंतर दिग्दर्शकांनी मोठी घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द काश्मीर फाइल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशीसोबत भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठात पोहोचले होते.  विद्यापीठात आयोजित चित्रपट महोत्सवात दोघे उपस्थित होते.


चित्रपट महोत्सवात पोहोचल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मुलांना आर्थिक मदत जाहीर केली. विवेक अग्निहोत्री म्हणाले की, 'विद्यापीठात चित्रपट अभ्यासासाठी 5 विद्यार्थ्यांना 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. 


ते पुढे म्हणाले, 'याप्रकरणी कुलगुरू विशेष समिती स्थापन करतील. ही समिती शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करेल. यासोबतच पल्लवी जोशीने चित्रपट महोत्सवात अशा विद्यार्थ्यांना आगामी सिनेमांमध्ये काम करण्याची संधी देणार असल्याची घोषणा केली.'


विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांच्या घोषणेनंतर अनेक विद्यार्थांच्या करियरला नवी कलाटणी मिळू शकते.