The Kerala Story Box Office Collection: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 'द केरला स्टोरी' (The Kerala Story DAY 1 Box Office) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून कोर्टात विरोधकांनी याचिकाही दाखल केली होती परंतु त्यांच्या मागणी ही फेटाळून लावली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 5 मे म्हणजेच शुक्रवारी काल हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं पहिल्याच दिवशी कोटी रूपये कमावले आहेत. तेव्हा जाणून घेऊया या चित्रपटाची कमाई किती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाला समीक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. Sacnilk या वेबसाईटनुसार, 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी 7.5 कोटी रूपयांची कमाई केली आहे.  या चित्रपटाचे एडव्हान्स बुकिंगही (Advance Booking) चांगलं होत असल्याचे कळते आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात हा चित्रपट चांगली कमाई करू शकतो. येत्या शनिवार-रविवारचा विकेंड आला आहे आणि त्याचबरोबर मे महिन्याच्या सुट्टीचाही माहोल आहे. (The Kerala Story Box Office Collection after opening day the film earns more than 7 crore)


 


त्यामुळे गेल्या काही दिवसात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला (Weekend) हा चित्रपट आता पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननंतर किती कमाई करतो हे येत्या काही दिवसांत ठरेल. काही ट्रेड विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट विकेंडला चांगली कमाई करू शकतो. ओपनिंगच्या हिशोबानं हा चित्रपट येत्या काही दिवसात अजून याच प्रकारे कमाई करण्याची शक्यत आहे. तेव्हा आता येत्या काही आकाड्यांकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 


हेही वाचा - ''पोटातल्या बाळानं...'' बॉलिवूड अभिनेत्रीनं Baby Bump चा फोटो शेअर करत सांगितला गरोदरपणातला अनुभव


'द केरला स्टोरी' या चित्रपटातून अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी या चौघींची प्रमुख भुमिका आहे. चित्रपटातून 32,000 मळ्याळी महिलांचे धर्मांतर केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यावरून बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. केरळ राज्य सरकारनंही या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. सेन्सॉर बोर्डानंही या चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र दिलं आहे. परंतु अद्यापही या चित्रपटाचा वाद कायम आहे.