The Kerala Story Box Office Collection Day 6 : दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनाच्या आधी पासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. हे इथेचं थांबलं नाही तर हा चित्रपट रोज कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. चित्रपटाला मिश्र प्रतिसाद येत असला तरी देखील चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 60 कोटींचा आकडा पार केला आहे. सगळ्यात आधी चित्रपटानं रविवार पेक्षा मंगळवारी जास्त कलेक्शन केलं तर त्यानंतर चित्रपटानं पाचव्या दिवसाच्या तुलनेत सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जास्त कलेक्शन केलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे आता समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार, ‘द केरला स्टोरी’नं सहाव्या दिवशी मिड वीकमध्ये 12 कोटींचा गल्ला केला आहे. सहाव्या दिवसाची कमाई पाहता चित्रपटानं सहा दिवसात 68.86 कोटी कमावले आहेत. चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 8.03 कोटी रुपयांच्या कलेक्शन केलं होतं. पुढे विकेंडला म्हणजेच शनिवारी 11.22 कोटी रुपये आणि रविवारी 16.40 कोटी रुपये कमावले. सोमवारपासून वीक डे सुरु झाला तरी देखील सोमवारी 10.07 कोटींची कमाई केली. मंगळवारी चित्रपटानं जवळ जवळ 11.14 कोटींचं जबरदस्त कलेक्शन केले आहे. तर काल म्हणजे बुधवारी चित्रपटानं 12 कोटींची कमाई केली. ते सगळं पाहता चित्रपटानं 60 कोटींचा आकडा पार केला आहे.


'द केरला स्टोरी'नं या चित्रपटांना टाकलं मागे


'द केरला स्टोरी'नं 68.86 कोटींची कमाई सहा दिवसात केलेली कमाई ही इतर काही मोठ्या चित्रपटांच्या तुलनेत खूप जास्त आहे. या चित्रपटानं आमिर खानचा लाल सिंह चड्ढा, अत्रय कुमारचा सेल्फी, कार्तिक आर्यनचा शहजादा या चित्रपटांना 'द केरला स्टोरी'नं मागे टाकलं आहे. आता लवकरच हा चित्रपट अजय देवगणच्या भोला या चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकणार आहे. 'भोला'नं बॉक्स ऑफिसवर एकूण 90 कोटींचा गल्ला केला होता. 'पोन्नियन सेल्वन 2' चित्रपटाच्या हिंदी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या तीनपट जास्त कमाई केली आहे. 


हेही वाचा : 'रिलेशनशिपमध्ये माझं पायपुसणं झालेलं...', Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य



'द केरला स्टोरी' या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्दी इदनानी आणि सोनिया बलानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा ही 32 हजार केरळच्या मुलींवर असल्याचे म्हटले जातं होते. मात्र, त्यानंतर ही कथा फक्त चार मुलींच्या आयुष्यावर आधारीत आहे असे सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चुकीची बातमी मिळत असल्याचं म्हटलं जात होतं. 'द केरला स्टोरी' या चित्रपटाला उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश आणि हरियाणा या राज्यात टॅक्स फ्री प्रदर्शित करण्यात आलं. तर पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाला बॅन करण्यात आले आहे.