मुंबई : काश्मिरच्या अखेरच्या हिंदू राणीचा जीवनपट लवकरच रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. कोटाच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या राणीच्या जीवनावर चित्रपट साकारण्याची जबाबदारी रिलायन्स एंटरटेंमेंट आणि फँटम फिल्म्सने घेतली आहे. १४व्या शतकातील ही राणी दिसायला फार सुंदर होती. त्याचप्रमाणे ती उत्तम प्रशासक आणि सैन्य रणनितीकार सुद्धा होती.
 
मधु मंटेना या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्याच्या म्हणण्यानुसार 'ही खुप दुर्भाग्याची गोष्ट आहे की, भारतीयांना काश्मीरच्या शेवटच्या राणीचे व्यक्तिमत्वच ठाऊक नाही. तिचे आयुष्य खूप नाट्यमय होते. ती भारतातील सर्वात सक्षम महिला शासक होती. त्यांच्याबद्दल माहित नसणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स एंटरटेंमेंटचे सीईओ शिवाशीष सरकारच्या म्हणण्यानुसार, 'कोटाच्या राणीची उल्लेखणीय कथा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक चांगला साकारण्याची आमची जबाबदारी आहे.' काश्मीरच्या राणीचा जीवनपट कधी रूपेरी पडद्यावर दाखल होईल हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.