मुंबई : संपूर्ण देशात कोरोना व्हायरस डोकं वर काढतं आहे. कधी काय होईल काहीचं माहिती नाही. अशात कोरोना व्हायरसला झुंज देणाऱ्या चाहत्याची अखेरची इच्छा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता  विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) ने पूर्ण केली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्याची इच्छा पूर्ण केली आहे. विजयचा हा चाहता कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हा मृत्यूच्या दारात असताना त्याने आपल्या आवडत्या कलाकारासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे विजयने त्याच्या चाहत्याची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. व्हिडिओ कॉलवर काही क्षण गप्पा केल्यानंतर चाहत्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर विजयने फेसबूकवर पोस्ट करत चाहत्याला श्रद्धांजली वाहिली आणि 'तुला कधीचं विसरू शकत नाही... हेमंत' असं लिहिलं आहे. विजयची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. 



पोस्टमध्ये  विजय म्हणतो, 'माझी इच्छा आहे, की तुझी ही आठवण कायम माझ्या टाईमलाईनवर राहावी. मी खुप आनंदी आहे मला तुझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहाण्याची संधी मिळाली. मी तुझ्या प्रेमाला अनुभवू शकलो आणि तू माझ्या... मी त्या सर्व लोकांचा आभार मानतो ज्यांनी मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं...'


विजयसोबत ऑनलाईन भेट झाल्यानंतर काही क्षणांतचं विजयचा चाहता हेमंतने या जगाचा निरोप घेतला. विजय अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) आणि डियर कॉमरेड या प्रसिद्ध चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला.