`कोई मिल गया`मधील बिट्टू तुम्हाला आठवतोय का? आता दिसतो असा
हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात त्याच्यासोबत अनेक बालकलाकार दिसले होते.
मुंबई : 2003 साली आलेला 'कोई मिल गया' हा चित्रपट असा होता की, सर्व वयोगटातील लोकांना तो खूप आवडला होता. जादूच्या अनोख्या पात्राने सर्वांची मनं जिंकली होती. हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात त्याच्यासोबत अनेक बालकलाकार दिसले होते. विशेष म्हणजे बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक कलाकारांनी बालकलाकार म्हणून काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आम्ही तुम्हाला अनुज पंडितबद्दलस सांगणार आहोत. ज्याने कोई मिल गया या चित्रपटात छोटे सरदार जीची भूमिका साकारली होती.
चित्रपटात त्याचं नाव बिट्टू होतं, सिनेमात तो हृतिक रोशनचा चांगला मित्र बनला आहे आणि बिट्टूने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि निरागसतेने सर्वांची मने जिंकली. आजही लोकं त्याला बिट्टू नावानेच ओळखतात. आपल्या गोंडसपणाने सर्वांना मोहित करणारा छोटा सरदार जी आता मोठा झाला आहे. आणि त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे.
आजकाल अनुज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनुज आता मोठा झाला आहे आणि खूप सुंदरही दिसू लागला आहे. छोट्या सरदारजींचा स्मार्ट लूक चाहत्यांना खूप आवडत आहे. अनुजची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंगदेखील आहे. अनुज आता 25 वर्षांचा असून त्याने पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त अनुज अनेक टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. परवरिशच्या सीझन 2 मध्ये तो शेवटचा दिसला होता. याशिवाय तो टोटल सियापामध्येही दिसला आहे.