`द कपिल शर्मा शो` बंद करण्यामागे कपिलचं खास कारण...
लोकांना पोट धरून हसायला लावणार शो होणार बंद
मुंबई : काही दिवसांपुर्वी विनोदवीर कपिल शर्माचा 'द दपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. पण प्रेक्षकांना तणाव मुक्त करणारा हा शो काही दिवस बंद राहणार आहे. तर हा शो का बंद होणार असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला होता. आता प्रेक्षकांच्या प्रश्नांना आणि चर्चांना खुद्द कपिलने पूर्णविराम दिला आहे. दरम्यान ट्विटरवर रंगलेल्या चॅट सेशनमध्ये एका चाहत्याने शो बंद करण्यामागचे कारण विचारले.
यावर कपिल म्हणाला, मी लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीसोबत घरी राहायचं आहे. कपिलने पहिल्यांदाच सोशल मीडियावर दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. 'द कपिल शर्मा शो' फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या अठवड्यात बंद होणार आहे.
शोच्या सुरूवातीला कलर्स वाहिनीच्या माध्यमातून हा शो प्रेक्षकांना अनुभवता येत होता. त्यानंतर कपिलने सोनी टीव्हीची वाट धरली. मध्यंतरी सुनील ग्रोवरसोबत झालेल्या भाडणांमुळे देखील शो काही काळ बंद होता. त्यानंतर जुनी टीम आणि नवीन कलाकारांसोबत कपिलने हिंमत न हारता शो पुन्हा सुरू केला.
लोकांना पोट धरून हसायला लावणारा 'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार आहे. पण काही दिवसांनंतर कपिल पुन्हा नव्या अंदाजात एन्ट्री करणार आहे. त्यामुळे कपिल आणि टीमचा नवा अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.