Pushpa 2: अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कोविड -19 च्या काळात प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाने कमाई केली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदना ही मुख्य भूमिकेत होती. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पुष्पा: द राइज' चित्रपट हिट झाल्यानंतर चाहते आणि प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा चित्रपट सुरुवातीला 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. 


कधी होणार 'पुष्पा 2' रिलीज? 


'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केलेल्या घोषणेनंतर चाहते आणि प्रेक्षकांची देखील उत्सुकता आणखी वाढली आहे. निर्मात्यांनी मैत्री ऑफिशियलकडून चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरण केले आहे. यामध्ये अल्लू अर्जुन त्याच्या प्रतिष्ठित पात्र पुष्पराजच्या अवतारात दिसत आहे. हा पोस्टर अनावरण करताना त्याला एक कॅप्शन देखील दिलं आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी आणखी 100 दिवस बाकी आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 



चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन निर्मात्यांनी पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची पुष्टी केली आहे की तो 6 डिसेंबरला प्रदर्शित होईल. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार नाही. निर्मात्यांच्या या घोषणेमुळे प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढली आहे. 


'पुष्पा: द राइज' प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद


'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने भारतात 267.55 कोटी रुपये तर जगभरात 350.1 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.