पाकिस्तानमध्ये मिळतेय सर्वात जास्त प्रेम-अक्षय कुमार
अक्षय चक्क भारताचा पारंपारिक दुष्मन असलेला देश पाकिस्तानचे कौतुक करत आहे.
मुंबई: बॉलिवूडचा अभिनेता खिलाड़ी अक्षय कुमारचा कल सध्या देशभक्तीवर आधारित सिनेमे बनवण्याकडे आहे. देशभक्तीवर आधारलेल्या सिनेमांमुळे त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण खिलाड़ी कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय चक्क भारताचा पारंपारिक दुष्मन असलेला देश पाकिस्तानचे कौतुक करत आहे. 'पाकिस्तानमध्ये माझे सिनेमे जास्त लोकप्रिय आहेत, जेवढे प्रेम मला पाकिस्तानमध्ये मिळतं तेवढे कोठेचं मिळतं नाही' अक्षयचा हा जुना व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानसाठी असे बोल देशवासियांना मुळीच आवडलेले नाहीत. त्याच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट आल्या आहेत. शाहरुख खान सलमान खान आणि अमिर खान तिघांनपैकी जर कोणी असे वक्तव्य केले असते तर भारतात त्यांना एन्ट्रीच करु दिली नसती त्याप्रमाणे अक्षय पैश्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशा प्रतिक्रीया नेटकऱ्यांकडून येत आहेत.
याआधी ही अक्षयचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कॅनडा येथे गेला होता. तिकडे त्याने आपले टोरोंटो येथे घर असल्याचे सांगितले आणि बॉलिवूडमधून निवृत्त झाल्यानंतर संपूर्ण संपत्ती घेवून कॅनडा येथे कायमचे राहायला येणार असल्याचे वक्तव्य त्याने केले. त्याचप्रमाणे विकीपीडियाने प्रोफाइलवर सुद्धा मुळ भरतीय असलेला कॅनडीयन अभिनेता असे लिहिले होते.
सध्या अक्षयच्या 'केसरी' सिनेमाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. सिनेमामध्ये शिख सैनिकांच्या शैर्याची यशोगाथा दाखवण्यात येणार आहे. अक्षय त्याच्या 'मिशन मंगल' आणि 'गुड न्यूज' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.