मुंबई : बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देत 'झिम्मा २'ने आता लवकरच चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करत आहे. आजही चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खूप भावनिक अशा या ट्रेलरमध्ये आयुष्यात जिवाभावाची मैत्री किती महत्वाची असते, हे दिसतेय. अशा जीव लावणाऱ्या मैत्रिणी असतील तर सगळया अडचणी क्षुल्लक वाटू लागतात. नात्यांची वीण घट्ट करणारा हा ट्रेलर मनाला स्पर्शून जाणारा आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमंत ढोमे म्हणतात, '' यापूर्वीच आम्हाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. मुळात आता हा चित्रपट हा आमचा राहिला नसून हा तुम्हा सर्वांचा झाला आहे. आयुष्यात मैत्री असेल तर खूप गोष्टी सरळ, सोप्या होतात. मग ते नाते कोणतेही असो. आई मुलीचे, सासू सुनेचे अथवा नवरा बायकोचे. मैत्री असणे खूप महत्वाचे. कोणत्याही अडचणींवर मैत्रीची हळुवार फुंकर मारली की आपोआप सगळं सुरळीत होते. हा नवीन ट्रेलर पाहून तुम्हालाही तुमच्या घनिष्ट मैत्रीची आठवण आल्या वाचून राहणार नाही. आतापर्यंत प्रेक्षकांनी जे प्रेम दिले असेच प्रेम यापुढेही द्याल याची खात्री आहे. ज्यांनी 'झिम्मा २' पाहिला त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा.''



झिम्माप्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे.  नुकताच रिलीज झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कडाऊननंतर रिलीज झालेला झिम्मा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते.लॉसिनेमा रिलीज होताच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. सगळीकडे या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत.  २४ नोव्हेंबरला रिलीज झालेला झिम्मा २ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे सिनेमागृहात अ‍ॅनिमल आणि सॅम बहादूर हे बॉलिवूडचे तगडे सिनेमा समोर असतानाही झिम्मा मात्र आपली जागा घट्ट धरुन आहे.या