लग्नाच्या एक्सक्लुझिव्ह फोटोंसाठी या OTT प्लॅटफॉर्मने katrina आणि vicky kaushal ला दिली इतक्या कोटींची ऑफर
कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनात अडकणार असल्याने त्यांच्या फोटोसाठी चाहत्यांमध्ये उत्सूकता आहे.
मुंबई : सेलिब्रिटींचे लग्न हे भारतातील अनेकांसाठी उत्सूकतेचा विषय असतो. दरम्यान, राजस्थानमध्येही एक बिग फॅट वेडिंग होणार आहे, त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. होय, आम्ही बोलत आहोत विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाबद्दल. दरम्यान, एक बातमी समोर आली आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मने विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina kaif) लग्नाच्या खास फोटोंसाठी त्याच्याशी संपर्क साधला आहे. एवढेच नाही तर या OTT प्लॅटफॉर्मने त्यांना भरघोस रक्कमेची ही ऑफर दिली आहे. (Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding Photos)
Pinkvilla मधील एका अहवालानुसार, परदेशातील ख्यातनाम व्यक्तींनी त्यांच्या लग्नाचे फुटेज आणि फोटो मासिक आणि चॅनेलला विकणे ही एक सामान्य गोष्ट आहे, कारण त्यांच्या जीवनातील क्षण पाहण्यासाठी बरेच चाहते उत्सूक असतात. अनेक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म भारतातही हाच ट्रेंड आणण्याचा विचार करत आहेत.
एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.
कतरिना आणि विकी ही ऑफर स्वीकारतील का?
कतरिना आणि विकीने यावर काय निर्णय घेतला आहे, याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर कतरिना आणि विकीने ही ऑफर स्वीकारली तर अनेक सेलिब्रिटींनी सजलेले हे लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर फीचर फिल्म म्हणून चित्रित केले जाईल. या चित्रपटात अनेक मनमोहक क्षण जोडले जाणार आहेत. लग्नाला उपस्थित कुटुंबातील सदस्य, स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, पाहुणे आणि इतरांच्या खास मुलाखती घेतल्या जातील.
रिपोर्टमध्ये पुढे लिहिले आहे की, कतरिना आणि विकी याबाबत काय निर्णय घेतात, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. पण ही ऑफर नाकारण्याची अधिक शक्यता आहे.
जेव्हापासून लग्नाच्या बातम्या चर्चेत आल्या, तेव्हापासून विकी आणि कतरिनाने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काहीही पोस्ट केलेले नाही. कतरिना आणि विकी या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची माहिती जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. अशा परिस्थितीत कतरिना आणि विकीने या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हातमिळवणी केली तर दोघेही श्रीमंत तर होतीलच, पण या माध्यमातून त्यांचे चाहतेही त्यांच्या खास दिवसाचा एक भाग बनू शकतील.