मुंबई : सध्या समाजात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी राणी पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. राणी तिच्या आगामी 'मर्दानी २' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारा भोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे आणि त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच संबंधतीत आपले मत परखडपणे मांडण्यासाठी ती वृत्तवाहिनीवर निवदीकेच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राणी समाजात जागृतता निर्माण करण्यासाठी वृत्तवाहिनाची मदत घेणार आहे. त्याचबरोबर समाजात घडत असलेलं वास्तव जगासमोर मांडणार आहे.



'मला अपेक्षा आहे की जनता या गोष्टीचा विचार गांभिर्यानं करेल. मी सुद्धा एक स्त्री आहे, एक आई आहे. त्यामुळे मला देखील या नराधमांची भिती वाटते. अगदी कमी वयाचे हे अपराधी आहे पण त्यांचं कृत्य फार मोठं आहे.' असं वक्तव्य तिने मिड डे सोबत बोलताना केलं. 


देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आजच्या मुली सुरक्षित नाहीत. दर वर्षी भारतात २ हजारांपेक्षा जास्त बलात्कार होतात. हे बलात्कार तरूणांकडून केला जात असल्याचं समोर येत आहे.


चित्रपटात राणी एका निर्भिड पोलिसाच्या भूमिकेला न्याय देताना दिसत आहे. 'यशराज फिल्म'च्या बॅनर खाली साकारण्यात येत असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. १३ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.