COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : गजेंद्र अहिरे दिग्दर्शित द सायलेन्स या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात मुख्य भूमिकेत आहेत, रघुवीर यादव, नागराज मंजुळे, कादंबरी कदम, अंजली पाटील आणि गौरी पाठारे.


नागराज मंजुळे याने नेमकी कशी भूमिका साकारली आहे, नागराजला प्रेक्षकांनी दिग्दर्शक म्हणून अनुभवलं आहे, पण त्यांना नागराजला आता कलाकार म्हणून पाहायचं आहे.


सिनेमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना एका चांगल्या विषयावर सिनेमा पाहण्याची संधी चालून आल्याचं दिसून येत आहे, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत असल्याचं ट्रेलरमध्ये लिहिण्यात आलं आहे.


द सायलेन्स या सिनेमाने ३५ पेक्षा जास्त फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड मिळवले आहेत.