Guess Who: बॉलीवूड स्टार्सचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि त्यांच्या लहानपणीच्या फोटोंना सर्वाधिक पसंती दिली जाते. बी-टाउन सेलेब्स अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून प्रसिद्धीच्या झोतात येतात.जे त्यांचे चाहते मोठ्या उत्साहाने पाहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. जो पाहून त्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला ओळखणे अवघडच नाही तर अशक्य आहे. Guess करा ही अभिनेत्री कोण आहे? काय झालं... कळत नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. या अभिनेत्री कपिल शर्माच्या शोशी खूप वर्ष जोडून आहेत. 


कदाचित आत्तापर्यंत तुम्हाला कळले असेल की आम्ही कशाबद्दल बोलत आहोत. होय... त्या अर्चना पूरण सिंग आहेत. ज्या 40 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये त्या जजच्या भूमिकेत दिसतात आणि आपल्या हास्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडतात. अर्चना पूरण सिंह या फोटोमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. अर्चना पूरण सिंह तोंडात बोट धरून बसल्या आहेत ज्यात त्या साधारण वर्षाच्या असतील. 



अर्चना पूरण सिंह 80 च्या दशकापासून सतत काम करत आहेत आणि त्या इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहेत. कॉमेडी रिअॅलिटी शोमधील त्यांचे काम प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरलं आहे. कपिल शर्मा शोच्या आधी तिने कॉमेडी सर्कस सारख्या शोला जज केले होते. याशिवाय तिने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.