मुंबई : 'चौक'ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. सगळीकडे फक्त 'चौक' चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.  सोशल मीडियावर म्हणा किंवा चौका-चौकात म्हणा... सध्या आता या चर्चेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे या चित्रपटातील 'जाळ जाळ झाला रे' या गाण्यामुळे!' प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, किरण गायकवाड आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार ‘जाळ जाळ झाला रे’वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्याच्या संगीतामुळे विशेष लक्ष वेधलं असून, संगीतकार ओंकारस्वरूप यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे, तर डॉ. विनायक पवार यांच्या भन्नाट शब्दांनी अगदी सगळ्यांना नाचायला भाग पाडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाळ जाळ झाला रे' या गाण्याचे संगीत, शब्द आणि भन्नाट डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतंय. एका समारंभात सर्वजण जल्लोष करत आहेत, उत्साहाने नाचत, आनंद व्यक्त करत आहेत. हे गाणं नुकतंच रिलीज झालं आणि सगळ्यांच्या सोशल मीडियावर दिसू लागलं... त्यामुळे चौकची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.  


'चौक'ची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर, चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे.तसेच, नागेश मोरवेकर यांच्या हटके स्टाईल गायनामुळे हे गाणं खूप व्हायरल होतंय. या गाण्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, यातील डान्स! प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, यातील हूकस्टेप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.   


देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित 'चौक'! या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला आहे. चौकचा टीझर प्रदर्शित होताच काही तासात सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे.या यापूर्वी देवेंद्र यांनी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या चित्रपटांमध्ये परिणामकारक भूमिका साकारली होती. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. हा चित्रपट १९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल.