मुंबई : स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला  आला आहे.  रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे  चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी आपल्याला २ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत,  पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, ‘’मुसाफिराच्या माध्यमातून मला प्रेक्षकांसाठी काहीतरी दर्जेदार करायचे होते. लॉकडाऊनच्या काळात सुचलेली माझी ही कथा चित्रपटात मांडण्याचा माझा हा प्रयत्न होता. मैत्रीची नवीन परिभाषा या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्यात मैत्री किती महत्वाची हेही ‘मुसाफिरा’च्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे. मैत्रीपर भाष्य करणारा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट आहे.’’


तर काहीदिवसांपुर्वी पुष्कर जोग दिग्दर्शित 'मुसाफिरा' चित्रपटातील मनाला भिडणारं असं गाणं प्रदर्शित झालं होतं.  जगण्याला नवे पंख देऊन पुन्हा भरारी घ्यायला लावणाऱ्या या फ्रेश गाण्याचं 'मन बेभान' असे बोल असून या सुंदर गाण्याला सुहित अभ्यंकर यांचा आवाज आणि श्रवणीय संगीत लाभले आहे. तर मनाला स्पर्श करणाऱ्या या गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिले आहेत. हे गाणे पूजा सावंत आणि चेतन मोहतुरे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट  २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.''



तर काही दिवसांपुर्वी  आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत 'मुसाफिरा' या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.