मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अक्षय कुमारचे चाहते सध्या काहीसे नाराज आहेत. या नाराजीमागील कारण म्हणजे पान मसाला ही जाहिरात.  यापूर्वी त्याने गुटख्याची जाहिरात केली होती. तेव्हापासूनच खरंतर त्याचे चाहते त्याच्यावर नाराज झाले होते. सोशल मीडियावर अजूनही लोकांमध्ये अक्षयबद्दल प्रचंड नाराजी पाहायला मिळते. त्याचबरोबर अक्षय कुमारचा एक न पाहिलेला फोटो नुकताच समोर आला आहे. या फोटोत अक्षयला ओळखणंही कठीण आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारचा एक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या फोटोमध्ये अक्षय फाटलेला कुर्ता आणि विखुरलेले केस, हातात चहाचा कप घेऊन बसलेला दिसतोय. युजर्स या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.  यावर एका यूजरने कमेंट करत म्हटलं आहे की, सर तुम्ही केसरी खूप बोललात. तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, आता विमलची जाहिरात केली तर लोकांना आवडणार नाही.



हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे फोटो चित्रपटाच्या शूटचा भाग देखील असू शकतो. त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या अक्षय त्याच्या पृथ्वीराज या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत मानुषी छिल्लर दिसणार आहे. या चित्रपटातून तो इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे.