मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि बिग बॉस-15 फेम अफसाना खान आणि साज शर्मा यांच्या लग्नात अडथळा येऊ शकतो. दोघांचं लग्न रोखण्यासाठी मोहाली कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्या महिला छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील आहे. अफसाना खान आणि साज शर्मा यांच्या लग्नाला स्थगिती द्यावी, असा अर्ज या महिलेने मोहाली कोर्टात केला आहे. आधी त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेचा दावा आहे की, अफसानाचा होणारा पती साज शर्मा याने तिची फसवणूक केली आहे. याआधी तिचं लग्न साज शर्मासोबत झालं होतं. पण फसवणूक करून साजने तिला घटस्फोट दिला.छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील रहिवासी अनुग्रह रंजन उर्फ ​​अनु शर्मा यांनी अफसाना खान आणि साज शर्मा यांचं लग्न रोखण्यासाठी मोहाली जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनु शर्माने दावा केला आहे की, तिने साज शर्मासोबत लग्न केलं होतं, त्यानंतर ते राहण्यासाठी जिरकपूरला आले.


6 सप्टेंबर 2014 रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्नाचं रिसेप्शन पार पडलं. दोघंही जिरकपूरला राहू लागले. एका वृत्तानुसार, अनु आणि साज यांना फेब्रुवारी २०१६ मध्ये एक मुलगी झाली, पण सासरच्या मंडळींकडून तिचा खूप छळ केला जात होता. त्यामुळे ती रायपूरला आली. यादरम्यान ती सासरच्या घरी जायची तेव्हा तिथेही तिला मारहाण व्हायची. 


महिलेचा आरोप-धोका देवून घेतला घटस्फोट 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनु शर्मा यांनी दावा केला आहे की, 2019 मध्ये साज शर्माने चंदीगढच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पण पेपरमध्ये त्यांचा पत्ता चुकीचा होता. त्यामुळे घटस्फोटाचे समन्स त्याच्यापर्यंत पोहोचले नाही आणि तिच्या संमतीशिवाय घटस्फोट मंजूर झाला. डिसेंबर 2021 मध्ये अनु शर्माला सोशल मीडियावरून कळलं की, साज उर्फ ​​साजन शर्मा पंजाबी गायिका अफसाना खानशी लग्न करणार आहे.


दोघांचीही एंगेजमेंट झाली आहे. यानंतर तिने मोहाली कोर्टात याचिका दाखल केली आहे. अनु शर्माचा दावा आहे की, साज शर्मा हे आधी ओडिशातीलभूषण पावर प्लांट में कांट्रेक्टर होता. कामानिमित्त तो रायपूरला येत असे. यादरम्यान दोघांची भेट झाली आणि नंतर लव्हमॅरेज झालं.