मुंबई : चित्रपट येतात आणि जातात पण काही पात्र आपल्या मनात राहतात. कालांतराने ती पात्रं आणि कलाकार लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका शरद कुमारने आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं. आजही अभिनेत्रींच्या सौंदर्याच्या चर्चा होत आहेत. चला जाणून घेऊया राधिकाच्या आयुष्यातील काही न ऐकलेल्या गोष्टी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत राधिकाने एक खास ओळख निर्माण केली आहे. 'नशीब अपना अपना' या चित्रपटातील चंदूच्या भूमिकेसाठी राधिका आजही ओळखली जाते. या चित्रपटात तिच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि फराह नाझ दिसले होते. हा चित्रपट आजही चाहत्यांच्या हृद्ययात असल्याचं पाहायला मिळतं.


आता अर्थातच राधिका चित्रपटांपासून दूर आहेत. पण अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चित्रपटात दिसणाऱ्या 'चंदू'चा लूक बदलला आहे. अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. राधिकाचे ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



राधिका शरद कुमारने बॉलिवूड, तमिळमध्ये 'नसीब अपना अपना', 'लाल बादशाह', 'जीन्स', 'आज का अर्जुन', 'रंगा', 'मारी', 'सिंघम 3', 'जेल' सारखे अनेक चित्रपट केले आहेत. यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने तिची चमकदार अभिनय प्रतिभा दाखवली आहे. पण तिला तिच्या 'नसीब अपना अपना' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रियता मिळाली. आजही तिची हेअरस्टाईल आणि तिचे संवाद चाहत्यांच्या ओठावर आहेत.