...तर हे असेल शाहरुख खानच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह?
पाहा शाहरुख खान काय ठेवणार पक्षाचं चिन्ह?
मुंबई : अनेक बॉलिवूड कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात देखील आपलं नशीब आजमावलं आहे. काही कलाकारांना यश आलं तर काही जणांच्या करिअरवर याचा परिणाम झाला. रजनीकांत आणि कमल हसन सारखे मोठे अभिनेते देखील राजकारणात उतरले आहेत. येणाऱ्या काळात दक्षिण भागात कोणाचं वर्चस्व प्रस्थापित होतं हे पाहणं उत्सूकतेचं ठरणार आहे.
किंग खान राजकारणात येणार?
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला देखील राजकारणात येण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने नकार दिला. शाहरुखच्या मते, राजकारणात लोकांसाठी काम करण्याची तीव्र इच्छा असावी लागते. सध्या ती त्याच्यात नाही असं त्याचं मत आहे.
राजकारणावर किंग खानचं मत
शाहरुख खानने एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, "मी एक अभिनेता आहे. देशासाठी माझी जबाबदारी पार पाडण्यावर मी विश्वास ठेवतो. पण राजकारण एक असं क्षेत्र आहे जेथे विशिष्टता असणं गरजेचं असतं. मला राजकारणाची माहिती आणि ज्ञान दोन्हीही नाही."
शाहरुख खानने पुढे म्हटलं की, 'राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट बनावं लागतं. तुम्हाला पूर्णपणे निस्वार्थ, समर्पण आणि लोकांचं जीवन उंचावण्यासाठी काम करावं लागतं. त्यामुळे या गोष्टींसाठी मी स्वार्थ न ठेवता किती काम करु शकतो हे मला माहित नाही. राजकारणात येण्याविषयी मला शंका आहे.'
काय असेल निवडणूक चिन्ह?
नवी पक्ष बनवण्याची संधी मिळाली तर निवडणूक चिन्ह काय असेल ? असा प्रश्न जेव्हा किंग खानला विचारण्यात आला तेव्हा शाहरुखने हसत हसत त्याची सिगनेचर पोज दिली.