Rekha Birthday : आपल्या डोळ्यांचा जादूने हजारोंना घायाळ करणारी बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री रेखा हिचा आज खास दिवस (10 ऑक्टोबर) आहे. रेखा आज तिचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी रेखा यांचं आयुष्य खूप कठीण होतं. रेखा यांच्या आईवर इतकं कर्ज होते की त्यांना लहान वयातच काम करावं लागलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार रेखा त्यांच्या वडिलांचा तिरस्कार करायच्या. त्यामागचे कारण म्हणजे त्यांनी रेखाला आपली मुलगी कधीच मानलं नव्हतं. गेल्या 56 वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये सक्रीय आहेत. पण गेल्या 10 वर्षांमध्ये त्या एकाही चित्रपटात झळकल्या नाहीत. ना त्या कुठल्या टीव्ही शोमध्ये दिसल्या. जर आपण मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर रेखा यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता, बंगले, वाहने आणि स्थावर मालमत्ता आहे.


रेखा यांच्याकडे किती संपत्ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 10 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असलेल्या रेखाकडे कोटींची संपत्ती आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर त्यांच्याकडे सुमारे 332 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचं मुंबईतील वांद्रे येथे आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत 100 कोटींच्या घरात आहे. रेखा यांच्या या राजवाड्यासारख्या बंगल्याचं नाव बसेरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा यांची मुंबई व्यतिरिक्त दक्षिण भारतातही करोडोंची प्रॉपर्टी आहे.


रेखा यांची राणीसारखी जीवनशैली


रेखाच्या जीवनशैलीबद्दल बोलायचं झालं तर त्या राणीचं आयुष्य जगतात. रेखा यांना महागडे दागिने आणि डिझायनर साड्या खूप आवडतात. त्यांच्या वॉर्डरोबमध्ये कांजीवरमपासून हजारो आणि लाखांच्या सिल्क डिझायनर साड्यांपर्यंत सर्व काही आहे. त्यांच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर अनेक महागड्या आणि आलिशान कार आहेत. त्यांच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट आहे, ज्याची किंमत 6.01 कोटी रुपये आहे. याशिवाय रेखा यांच्याकडे Audi A8 आहे, ज्याची किंमत 1.63 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे BMW i7 इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 2.03 कोटी रुपये आहे. मर्सिडीज बेंझ एस क्लास आणि 2.17 कोटी रुपयांची होंडा सिटी देखील आहे.


रेखा यांनी 180 चित्रपटांमध्ये काम केले


सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 180 चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांना एक राष्ट्रीय पुरस्कार आणि 4 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. रेखा यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. साऊथ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रेखाने 70 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सावन भादो हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट 1970 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांचा नायक होता नवीन निश्चल. रेखा यांनी नागिन, खूबसूरत, सुहाग, राम बलराम, मिस्टर नटवरलाल, जुदाई, जाल, उमराव जान, खून भरी मांग, खिलाडी का खिलाडी, कोई मिल गया, क्रिश यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्या शेवटची 2014 मध्ये आलेल्या सुपर नानी चित्रपटात झळकल्या होत्या.