मुंबई : भारतीय चित्रपटांना  साथ मिळते ती म्हणजे गाण्यांची. चित्रपटांमध्ये  गाणी नसतील, तर प्रेक्षकांना चित्रपटामध्ये रस राहत नाही. संगीतामुळे चित्रपटाला एक वेगळी मजबुती येते. संगीतामुळे निराश मन देखील प्रफुल्लीत होतं. तुमच्या मतानुसार एका चित्रपटात 6, 8 फारतर 10 गाणी असतील. पण नाही एक असा चित्रपट आहे, ज्यामध्ये तब्बल  70 पेक्षा जास्त गाणी आहेत. तर आज आपण जाणून घेवू तो चित्रपट नक्की कोणता होता. ज्यामध्ये तब्बल 71 गाणी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1932 साली प्रदर्शित झालेल्या 'इंद्र सभा' चित्रपटामध्ये 71 गाणी होती. चित्रपट तीन तासांचा होता.  'इंद्र सभा' चित्रपटाचं दिग्दर्शन जेजे मदन यांनी केलं होतं. आघा हसन अमानत यांनी 1853 साली लिहिलेल्या उर्दू नाटकावर हा चित्रपट आधारित होता. नागरदासयांनी चित्रपटाला संगीत दिलं होतं. या चित्रपटानंतर त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. 


कालांतराने चित्रपटांमध्ये गाण्यांची संख्या कमी झाली. 1943 साली प्रदर्शित झालेल्या ‘शकुंतला’ चित्रपटात जवळपास 42 गाणी होती.  90 व्या दशकात पाय ठेवताचं चित्रपटांमध्ये 12 ते 14 गाणी असायची. 'हम आपके है कौन' या  चित्रपटा देखील जास्त गाणी होती. त्यानंतर  ‘सिलसिला’, ‘मोहब्बतें’ आणि ‘ताल’ या चित्रपटांमध्ये 0 पेक्षा जास्त गाणी होती.