मुंबई : प्रत्येक मुलाचे नाव त्यांच्या पालकांच्या नावावरून ठेवले जाते. तसेच लोकं ज्योतिषाकडे जाऊन देखील आपल्या मुलांची नावं ठेवतात. त्यानंतर लोकांचे नाव हीच त्यांची ओळख बनते. शाळेपासून ते करिअरपर्यंत लोकांना त्यांच्या नावनेच ओळखले जाते. परंतु असे ही काही लोकं आहेत, जे आपली ओळख बनवण्यासाठी आपलं नावंच बदलतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी इंडस्ट्रीत प्रसिद्ध होण्यासाठी अपलं नावं बदललं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवू़डमध्ये काही असे स्टार्स आहेत, त्यांना आपण सर्वच जण त्यांच्या बदललेल्या नावाने ओळखतो, परंतु त्यांचे खरे नाव आपल्याला माहित नसते. तर आम्ही तुम्हाला अशाच सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आपलं नाव बदललं आहे.


अजय देवगण


अजय देवगण एक सुपर टॅलेंटेड अभिनेता आहे. अजय देवगण हे नाव बदलणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय देवगणचे जन्माचे नाव विशाल वीरू देवगण आहे. परंतु नंतर त्याने सिनेमाक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आपलं नाव बदललं आहे.


अक्षय कुमार


बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. या अभिनेत्याचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. एकदा अक्षय कुमारने शेअर केले की, एके दिवशी तो कोर्टात गेला आणि त्याने त्याचे नाव बदलले. ज्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे.


जॉन अब्राहम


हॅण्डसम हंक जॉन अब्राहम हा अनेक भारतीय मुलींचा क्रश आहे. जॉनने 2003 मध्ये 'जिस्म' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर धूम या चित्रपटातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. परंतु अभिनेत्याचे जन्माचे नाव फरहान अब्राहम आहे.


कियारा अडवाणी


कियारा अडवाणीचे खरे नाव आलिया अडवाणी आहे. इंडस्ट्रीत आलिया भट्ट नावाची अभिनेत्री आधीपासूनच असल्याने सलमान खानने तिला तिचे नाव बदलण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे तिने आपलं नाव बदललं.


कतरिना कैफ


बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असते. रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ लवकरच विकी कौशलसोबत लग्न करणार आहे. कतरिना कैफचे खरे नाव कतरिना टर्कॉट होते. जे तिने नंतर बदललं.


प्रिती झिंटा


प्रिती झिंटा ही तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने 'सोल्जर', 'वीर-जारा', 'क्य कैहेना' आणि 'कल हो ना हो' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रिती झिंटाचे नाव प्रीती नसून प्रीतम सिंग झिंटा आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.


सैफ अली खान


बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हा शाही पतौडी पॅलेसचा मालक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. नवाब असण्यासोबतच त्यांचे नावही पूर्णपणे वेगळे होते. सैफ अली खानचे खरे नाव साजिब अली खान आहे. त्याचे खरे नाव उघड झाले जेव्हा त्याचे करीनाशी लग्नाचे प्रमाणपत्र चुकून इंटरनेटवर व्हायरल झाले.


सलमान खान


सलमान खानला बॉलिवूडचा 'भाई' म्हणून ओळखले जाते. सलमान खानचे नाव अलसी नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे.


शिल्पा शेट्टी


शिल्पा शेट्टी हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. तिने 1993 मध्ये 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. भारतीय चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवल्यानंतर, तिने ब्रिटिश रिअॅलिटी टीव्ही शो बिग ब्रदर सीझन 5 जिंकून प्रचंड लोकप्रियता मिळवली. शिल्पा शेट्टीचे खरे नाव अश्विनी शेट्टी होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे पण ज्योतिषाने तिला तसे करण्यास सांगितल्यामुळे तिच्या आईने अभिनेत्रीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.


सनी देओल


धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलने 2001 मध्ये आलेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाने इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले. हा अभिनेता बॉलीवूडचा अँग्री मॅन म्हणून ओळखला जातो आणि त्याला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. सनीची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. परंतु त्याचं खरं नाव अजय सिंग देओल असे होते.


सनी लिओनी


बी-टाऊनची 'बेबी डॉल' सनी लिओनी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे.


टायगर श्रॉफ


टायगर श्रॉफ त्याच्या चित्रपटांमध्ये स्वतःचे स्टंट करण्यासाठी ओळखला जातो. टायगर श्रॉफचे नाव दुसरेच आहे. हे त्याचे फक्त ऑनस्क्रीन नाव असले तरी त्याचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे. त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांनी खुलासा केला होता की, तो आपल्या मुलाला प्रेमाने 'टायगर' म्हणतो कारण तो लहान असताना वाघासारखा चावायचा.