`या` सेलिब्रेटींनी केलेली विचित्र फॅशन पाहून तुम्ही म्हणाल; Urfi, Rakhi फॅशन तरी बरी
पण तुम्हाला माहितीये का की सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या उर्फी जावेदच्या आधी या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनीसुद्धा चित्र-विचित्र फॅशनची कास धरली होती.
Bollywood Celebs Weird Fashion: आजकाल सगळीकडेच फॅशनची जोरदार क्रेझ आहे. बॉलीवूडमध्ये म्हणा किंवा हॉलीवूड, सगळीकडे अतरंगी फॅशनची क्रेझ कायम आहे. अगदी ताज उदाहरणं म्हणजे रणवीर सिंग. त्यातूनही आता सर्वात जास्त क्रेझ आहे ती उर्फी जावेदची. उर्फी जावेदची फॅशन बघून भल्याभल्यांना घाम फूटतो आणि त्यातून रणवीर सिंगनेही उर्फीला आपलं फॅशन आयडॉल मानलं आहे.
पण तुम्हाला माहितीये का की सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या उर्फी जावेदच्या आधी या बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनीसुद्धा चित्र-विचित्र फॅशनची कास धरली होती. त्यांची फॅशन पाहून तुम्हीही म्हणाल की यांच्यापेक्षा उर्फी बरी. या सेलिब्रेटींनी सगळ्यांसमोर अशी विचित्र फॅशन केली होती की ती पाहून भलेभले चाट पडले.
या सेलिब्रेटींना अशा विचित्र फॅशनमुळे चांगलंच ट्रोल केलं होतं. त्यांच्याकडे कधीकधी पाहून असंही वाटतं की फॅशन डिझायनर्स यांची चांगलीच फजिती करतात पण या सेलिब्रेंटींकडेही ही विचित्र फॅशन कॅरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
प्रियंका चोप्रा -
प्रियांका चोप्रा जोनासला फॅशनचा खूप चांगला सेन्स आहे. कान्स आणि मेट गालामध्ये तिने जे काही लुक्स कॅरी केले आहेत ते पूर्णपणे आऊट ऑफ द बॉक्स होते. तिनं ऑर्ब ड्रेससारखा हटके ड्रेसही कॅरी केला होता परंतु त्यावरून तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यातून मध्यंतरी तिनं एका मोठ्या फॅशन फेस्टिवलमध्ये स्वतःला बॉलसारख्या मोठ्या गोलात रॅप करून घेतले होते.
रणवीर सिंग -
अभिनेता रणवीर सिंग हा फॅशनच्या बाबतीत खूप पुढे गेला आहे. त्याच्या फॅशनबद्दल आता सगळ्यांनाच माहिती झालं आहे. कधी पायजमा तर कधी लेहेंगा अशी फॅशन करणारा रणवीर त्याच्या हेअरस्टाईलासाठीही ओळखला जातो. एकाच वेळी दोन पोनी बांधण्यापासून ते अगदी मुलींप्रमाणे लांबलचक केस करण्यापर्यंत रणवीरनं फॅशन अवलंबली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन -
कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्यानं चौथ्यांदा हजेरी लावली तेव्हा तिने एकदम फ्लफी लूक निवडला. तिनं जांभळ्या रंगाची लिपस्टिकचा फ्लफी अल्बट्रॉस लूक देखील सुंदरपणे कॅरी केला होता परंतु ती या लुकवरून चांगलीच ट्रोल झाली होती.
सोनम कपूर -
सोनम कपूर ही बॉलीवूडची फॅशन आयकॉन मानली जाते. सगळेच सोनमच्या फॅशनला एडमायर करतात. मध्यंतरी तिनं फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये हाफ पँट आणि त्यानंतर ब्लेझर घातला होता. मेन्सवेअर फॅशनसारखी फॅशन केल्यानं तिला चांगलंच ट्रोल केलं होतं. नुकतंच तिनं एका फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं ज्यात गरूड या पक्षांच्या रूपासारखा तिनं पोशाख परिधान केला होता त्यावरून तिला चांगलच ट्रोल केलं होतं.
दीपिका पादूकोन -
दीपिकाचीही फॅशन सगळीकडेच लोकप्रिय आहे. तिच्या फॅशन सेन्सवरून तिचंही सगळीकडे कौतुक केले जाते. परंतु रणवीरप्रमाणे तिनंही विचित्र फॅशन कॅरी केली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिनं खूप लांबलचक असा गाऊन घातला होता जो एखाद्या पक्षाच्या पंखांप्रमाणे वाटत होता. तिच्या या लुकवरून तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती.