मुंबई : आलिया भट्ट 2022 मध्ये 'गंगूबाई काठियावाडी', 'RRR', 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' आणि 'डार्लिंग्स' या चार चित्रपटांमध्ये दिसली. यापैकी 'डार्लिंग्स' OTT वर रिलीज झाला, तर बाकीचे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आणि तिन्ही चित्रपट हिट झाले. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' यांचा समावेश आहे. मात्र आलिया तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे जेवढी चर्चेत असते तेवढीच ती तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतीच आई झाली आहे. राहा असं तिच्या लेकीचं नाव आहे. आई झाल्यानंतर आलियाचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. आलियाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत तिच्याच झालेल्या बदलांबद्दल सांगितलं आहे. इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आलियाने लिहीलं आहे की, ''मातृत्वाने माझ्यात बदल झाले आहेत. माझं शरीर, माझे केस, माझी ब्रेस्ट, माझी स्किन, माझं प्राधान्यक्रम आणि माझ्यातल्या भीतीलाही बदललं आहे. मात्र तुम्हाला मन पहावं लागेल, की माझं मन किती मोठं आहे.'' आलियाने हा पोस्ट मॅसेज माय बेस्ट फ्रेंण्ड नावाच्या युजर अकाऊंन्टवरुनही शेअर केला आहे.


आई झाल्यापासून आलिया भट्ट तिच्या आयुष्यातील या टप्प्याबद्दल सतत बोलत असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान आलियाने सांगितलं की, तिने सुरुवातीच्या काळात तिच्या प्रेग्नेंसीची बाब सर्वांपासून सिक्रेट ठेवली होती. 


याबाबत बोलताना आलिया म्हणाली की, "साहजिकच काम खूप महत्त्वाचं आहे, पण एक वेळ अशी आली जेव्हा माझं बाळ आणि  माझं आरोग्य हे माझं प्राधान्य होतं. सुदैवाने माझ्या गर्भधारणेमुळे मला शारीरिकदृष्ट्या पाठी ढकललं नाही. सुरुवातीचे काही आठवडे खूप खडतर होते. कारण मी खूप थकले होते. त्यात मला खूप मळमळ व्हायची. पण मी याबद्दल कोणालाही सांगितलं नाही, कारण तुम्ही पहिल्या 12 आठवड्यांपर्यंत कोणालाही सांगू नका. असं मला सांगण्यात आलं होतं, म्हणून मी ही गोष्ट स्वतःकडेच ठेवली, पण मी माझ्या शरीराचं ऐकत राहिले."


आलिया भट्टने 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईत रणबीर कपूरसोबत लग्न केलं. आलियाने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जून 2022 मध्ये तिच्या प्रेग्नंसची घोषणा केली आणि नोव्हेंबरमध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, तिच्या बाळाचं नाव आलिया भट्टची सासू आणि रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी राहा ठेवलं.


लग्नाच्या अवघ्या 7 महिन्यांतच आई झाल्यानंतर आलिया भट्टला सोशल मीडिया युजर्सने प्रचंड ट्रोल केलं. तिची प्रेग्नन्सी लग्नाआधीची असल्याचा अंदाज लोक बांधत होते. मात्र, याबाबत ना रणबीर काही बोलला ना आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली.