Television वर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या `या` अभिनेत्रींचे शिक्षण किती झालंय तुम्हाला माहितीये?
जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत?
Higest Educated TV Actresses: कधी टीव्हीवर खलनायिका तर कधी सुसंस्कृत सूनेचा रोल करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे चांगल्याच प्रसिद्धीत असतात. पण अभिनयासोबतच या अभिनेत्री अभ्यासातही भरपूर पुढे आहेत. जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत?
तेजस्वी प्रकाश: तेजस्वी ही सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी तिने शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले. तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.
सुरभी ज्योती: 'कुबूल है' या मालिकेत झोयाची भूमिका साकारून सुरभीने खूप प्रशंसा मिळवली होती. अभिनयात पारंगत असलेल्या सुरभी ज्योतीने इंग्रजीतून एम. ए केले आहे.
रिद्धिमा पंडित: रिद्धिमा पंडितने टीव्हीवर अनेक उत्तोमोत्तम भुमिका केल्या आहे. तिची 'बीवी मेरी रजनीकांत' ही सिरियल खुप गाजली होती. तिने समाजशास्त्र या विषयात एमए केले आहे.
दीपिका सिंग: 'दिया और बाती हम' या मालिकेतील संध्याही लोकप्रिय आहे. संध्याने आपले शिक्षण झाल्यावर मार्केटिंगची पदवी घेतली होती.
त्रिधा चौधरी: 'आश्रम'फेम बबिता जी म्हणजेच त्रिधा चौधरीने मायक्रोबायोलॉजी या विषयात पदवी मिळवली आहे.
जास्मिन भसीन : 'दिल से दिल तक' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली जस्मिन भसीन सध्या खूप चर्चेत आहे. जास्मिनं एमबीए केले आहे.